loader
Breaking News
Breaking News
Foto

एकच जिद्द वाढवण बंदर रद्द, संविधान के सन्मान में हम महिला मैदान में अशा घोषणा देत महिला आंदोलकांनी बरिकेट्स तोडून आगेकुच,600 महिलांना ताब्यात, आंदोलन पेटलं!

पालघर दि. 26 नोव्हेंबर (शरद मोरे )एकच जिद्द वाढवण बंदर रद्द, संविधान के सन्मान में हम महिला मैदान में, अशा घोषणा देत हजारो महिला बरिकेट्स तोडून आगेकूच केली. पोलिसांनी सुमारे 600 महिलांना आंदोलकांना ताब्यात घेतले. आक्रमक झालेल्या आंदोलकांपुढे पोलिस प्रशासन नमले. अखेर उशीरा आंदोलकांना सोडले. मात्र, गेले 100दिवस शांततेत सुरु असलेले आंदोलन आता पेटणार आहे.वाढवण बंदर विरोधी आंदोलनात मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार, आदीवासी, शेतकरी, कामगार उतरले आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण येथे बांधले जात आहे. भारतातील सगळ्यात मोठं आणि जगातील टॉप 10 मधली एक बंदर आहे. हे बंदर जमिनीवर नाही तर समुद्रात भराव टाकून नवीन जमीन तयार करुन बांधलं जात आहे. त्याला ग्रीनफिल्ड डीप ड्राफ्ट मेजर पोर्ट म्हणतात. एकूण खर्च 76,220 कोटी असून त्याच भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 ऑगस्ट 24 रोजी करण्यात आलं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पालघर जिल्ह्यात लादल्या जाणाऱ्या वाढवण बंदर सह इतर विनाशकारी प्रकल्पाविरोधात सातत्याने आंदोलन होत आहे. वरोर येथे शंभराहून अधिक दिवस धरणे आंदोलन सुरू आहे. अशातच आज विनाशकारी प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेत वाढवण परिसरातील महिला आंदोलकांनी सकाळी ११ वा. रॅली काढून संविधान साजरा करण्याचे ठरवले. त्यास पोलिसांनी विरोध केला. डहाणूचे आमदार कॉ. विनोद निकोले यांनी पोलिसांना विनंती केल्यानंतरही रॅली काढू दिली गेली नाही. दुपारी ३.३० वा. भारताचे संविधान, उद्देशिका, भारताचा झेंडा तसेच भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तसबीर घेऊन हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या. संविधान दिवस साजरा करण्यासाठी लोकशाही मार्गाने रॅली करणाऱ्या महिलांना बॅरिकेड्स लावून महिलाना पोलिसांनी अडवले. पुरुष पोलिसांनी बॅरिकेड्स महिलांच्या अंगावर ढकलले. परंतु, एकच जिद्द वाढवण बंदर रद्द, संविधान के सन्मान मे हम महिला मैदान मे अशा घोषणा देत महिलांनी सर्व बॅरिकेड्स बाजूला सारून पुढे कूच केली.गेले 100 दिवस वाढवण बंदर विरोधी आंदोलन सुरु आहे. नुकतेच बिरळसा मुंडा जयंती करण्यास पोलिस प्रशासनाने बंदी घातली होती. यावेळी वाढवण पांचक्रोशीतील महिला, पुरुष एकत्र येत संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान रॅली काढण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार प्रस्तावित वाढवण बंदरासाठी रस्त्याचे काम करण्याचा प्रयत्न होत आहे तिथे महिला. पोहोचल्यावर त्यांना तिथेच अडवण्यात आले. संध्याकाळी 5 वा. साधारण 600च्या वर महिलाना पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतले आणि डहाणूला नेले.

टाइम्स स्पेशल

आंदोलकांच्या दबावामुळे सायंकाळी 6च्या आसपास महिलाना सोडून देण्यात आले. यावेळी सीपीएएम चे कॉ. अशोक ढवळे, डहाणूचे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ. विनोद निकोले, कॉ. लहान दौडा, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, मधुबाई, भूमिसेना आदिवासी एकता परिषदेचे भरत वायडा, वर्षा वायडा, प्रशांत पाटील, शशी सोनवणे, सत्यजीत चव्हाण, सुजय मोरे सह इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg