खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये गुरुवार दिनांक 26 नोव्हेंबर 2026 रोजी विज्ञान व गणित प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या प्रदर्शनाची सुरुवात कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवर करनिरीक्षक गायत्री माने, विस्तार अधिकारी संदीप कंदुरकर, उपअभियंता इम्रान शेख, संस्थेचे माजी चेअरमन बिपीनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी, रो. अभय तलाठी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उपप्राचार्य राहुल गाडबैल, शैलेश देवळेकर, तेजश्री कानडे, समन्वयक देवयानी महाजन व प्रितम वडके यांच्या शुभहस्ते दीपप्रज्ज्वलन, सरस्वती पूजन व फीत कापून करण्यात आली.
यानंतर मान्यवरांचे शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित ‘अदृश्य विनाशाचा सम्राट’ या नाटिकेचे सादरीकरण केले. तसेच ५३ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेल्या ‘कॅश्युशेलोरा’ या अभिनव वैज्ञानिक प्रकल्पातील विद्यार्थी स्पंदन धामणे व अर्णव परकाळे व होमीभाभा बालवैज्ञानिक पुरस्कार प्राप्त अर्णव घुंबरे, अथर्व हलगवार व पूर्वी सूर्यवंशी या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख मान्यवर करनिरीक्षक मा. गायत्री माने यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक करून दैनंदिन जीवनातील विज्ञान व गणिताचे महत्त्व अधोरेखित केले. प्रदर्शनातील आकर्षक सजावट, विद्यार्थ्यांचे प्रयोग व त्यासाठी घेतलेली मेहनत यांचे विशेष कौतुक करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान व गणितावर आधारित विविध प्रयोग व प्रतिकृती तयार केल्या होत्या. यामध्ये टाकाऊतून टिकाऊ वस्तू, वीजनिर्मिती, पर्यावरण संवर्धन, मानवी शरीररचना, आरोग्य, शेती, गणितीय संकल्पना, वैदिक गणित, भौमितिक रचना तसेच दैनंदिन जीवनातील विज्ञान व गणिताचे उपयोग अशा विविध विषयांवरील उपकरणे लक्षवेधी ठरली. प्रत्येक गटाने माहितीपत्रकाद्वारे आपल्या प्रयोगांची माहिती प्रभावीपणे सादर करून उपस्थित मान्यवर व परीक्षकांची मने जिंकली. पालकांनीही प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेतील तज्ज्ञ पालकांनी परीक्षण व मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी विज्ञान व गणित विषय शिक्षकांसह सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवर व परीक्षकांचे आभारपत्र देऊन आभार मानण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनुजा धूत यांनी केले. संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी विज्ञान व गणित प्रदर्शनास शुभेच्छा दिल्या.















































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)

















































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.