loader
Breaking News
Breaking News
Foto

मेर्वी जि.प. प्राथमिक शाळेत संविधान दिन उत्साहात

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी व अंगणवाडी मेर्वी गुरववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी दिप्ती पावसकर (शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष) यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमावेळी सर्व मुलांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाषणाव्दारे माहिती सांगितली व उपस्थित पालक व शिक्षकांनी प्रभातफेरी काढून जनजागृती केली. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मसरज शेख मुख्याध्यापक, शाहनाज भाटकर सहशिक्षिका, सत्यश्री खर्डे अंगणवाडी यांनी परिश्रम घेतले. यावेळी सेविका स्नेहल कुरतडकर सह., शारदा ताई गुरव, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक वर्ग उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg