loader
Breaking News
Breaking News
Foto

पटवर्धन हायस्कूलमध्ये संविधान दिनानिमित विविध उपक्रम संपन्न

रत्नागिरी - रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूल मध्ये २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस विविध उपक्रमांनी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये आपल्या देशाच्या संविधानाबद्दल माहिती व्हावी त्यांना संविधानाबद्दल आदर तसेच संविधानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा, हस्तकला यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उद्घाटन प्रशालेचे उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत संविधानाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेचे नियोजन प्रशालेचे शिक्षक कैलास वाडकर यांनी केले तर स्पर्धेचे सूत्रसंचालन श्रद्धा बोडेकर, परिक्षक म्हणून गौरी गांधी, पूनम काटकर, गायत्री गवळी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या पर्यवेक्षिका कल्पना शिरोळकर, माजी शिक्षक नितीन मोहिते उपस्थित होते. इयत्ता नववी मधील विभा संदेश कडव, शांभवी सचिन रेमणे व श्रुती संतोष सावंत या यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसेही देण्यात आली. संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानावर आधारित विविध हस्तकलेच्या वस्तू, चित्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंग इत्यादींचे ही सादरीकरण केले. संविधान दिनानिमित्त प्रशालेच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg