loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत १७ वर्षांखालील शालेय विद्यार्थ्यांसाठी लेदर बॉल क्रिकेट लीग स्पर्धेचा शुभारंभ

संगलट (इक्बाल जमादार) - दापोली क्रीडा मंडळाच्या वतीने १७ वर्षांखालील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सरपंच अक्षय फाटक यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. दापोलीच्या क्रीडा विश्वात प्रथमच अशा प्रकारच्या शालेय लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, हा दापोली क्रीडा मंडळाचा अभिनव उपक्रम ठरत आहे. या उद्घाटनप्रसंगी दापोली क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजेश घोसाळकर, सचिव शेखर आग्रे, खजिनदार जतीन साळगावकर, अमित बिंद, नवाज फकी, मकबुल बरोंडकर, मंडळाचे प्रशिक्षक मनोज बागकर, वासावे, श्रेयस खटावकर, कौस्तुभ वंडकर, मंगेश घाणेकर, आशिष घाणेकर, संस्कार बिंद, रितेश गुजर, सूरज खेडेकर, शोएब सहिबोले, श्रेयस मेहंदळे सर, महेंद्र शिंदे, समीर झगडे, सचिन मुरुडकर, स्वप्नील शिंदे, अमित इंदुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेमागील संकल्पना मांडताना जतीन साळगावकर यांनी विद्यार्थ्यांमधील क्रिकेट कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळावे, या स्पर्धेतून भविष्यातील नवे स्टार खेळाडू घडावेत आणि आजची तरुण पिढी मोबाईलच्या आहारी न जाता मैदानाकडे वळावी, हा उद्देश असल्याचे सांगितले. त्यांच्या या संकल्पनेला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या स्पर्धा सलग तीन दिवस चालणार असून, सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक आकर्षक बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे. दापोलीतील क्रिकेटप्रेमी नागरिकांनी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शालेय क्रिकेट लीग स्पर्धेचा आनंद घ्यावा व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन दापोली क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg