सावंतवाडी, (प्रतिनिधी) - पंचायत समिती सावंतवाडी येथे गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी 'घरघर संविधान' या उपक्रमांतर्गत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतींचे सभापती सुष्मिता जाधव यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सभागृहात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या वेळी पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव, सदस्य जितेंद्र गावकर, प्रणाली टिळवे, शरद धाऊसकर, मायकल डिसोझा, गटविकास अधिकारी निलेश जाधव, लघुपटबंधारेचे उपअभियंता मंदार जुवेकर, गट शिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि तालुक्यातील ग्रामस्थ लाभार्थी उपस्थित होते.
उपस्थित लाभार्थ्यांमध्ये आत्माराम सहदेव साळगावकर (माजगाव), शुभांगी नागेश ताटे (चराठे), स्नेहा संतोष म्हाळटकर (कारीवडे), सुचिता गोविंद माळकर (कारीवडे), रत्नमाला जिवबा वीर (बांदा), सुनिता सिताराम मुळये (बांदा), उमेश तुकाराम राऊळ (कोलगाव), गणपत नाना आंगचेकर (आंबेगाव), दाजी न्हानू तेली (आंबेगाव), दुर्वा देवदत्त पालव (कारीवडे), अक्षय सोमा जाधव (माजगाव), सुरेश केशव सातोर्डेकर (आरोंदा) आणि निलेश शशिकांत तारी यांचा समावेश होता. मनोगत व्यक्त करताना गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विशद केले. सदस्य जितेंद्र गावकर यांनी भारतीय संविधान प्रत्येक घरात लावणे आवश्यक असून, त्याचा मान राखत संविधानानुसार देशाचे राजकारण व प्रशासकीय कामकाज चालवले जात असल्याचे सांगितले. सभापती सुस्मिता जाधव यांनी मूलभूत अधिकार व कर्तव्ये तसेच लोकशाही मूल्यांच्या जतनाबाबत आपले विचार मांडले.
या संविधानामुळेच मागासवर्गीय समाजातील एका महिलेला तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पंचायत समितीच्या विविध योजनांच्या ग्रामीण लाभार्थ्यांपर्यंत संविधानातील मूल्ये व विचार पोहोचवण्यासाठी 'घरघर संविधान' उपक्रमांतर्गत उद्देशिकेच्या प्रतींचे वितरण करण्यात आले. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावीत आणि जनजागृती व्हावी, हा यामागचा उद्देश असल्याचे स्पष्ट करत कृषी अधिकारी शुभदा सावंत यांनी आभार मानले.















































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)

















































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.