मंडणगड (प्रतिनिधी) : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा देव्हारे येथे विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, भारतीय संविधानाचे महत्त्व समजावे तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संविधान दिनानिमित्त शाळेच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह तिरंगा ध्वज आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिमा हातात घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संविधानविषयक घोषवाक्ये देत विद्यार्थ्यांनी परिसरात जनजागृती केली. यावेळी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, तर संविधान गीताच्या सादरीकरणातून संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात केंद्रप्रमुख रजनी जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा आढावा घेत भारतीय संविधानाची निर्मिती, त्याचे महत्त्व तसेच संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार व कर्तव्ये याविषयी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी संविधानविषयक गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिक्षणप्रेमी तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानाचे महत्त्व विशद केले. भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिकाला समानतेचा आणि न्यायाचा अधिकार देणारे सर्वोच्च मार्गदर्शक आहे. विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये केवळ अभ्यासापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारावीत, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, संविधान दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचा अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये केंद्रप्रमुख रजनी जाधव, केंद्रशाळेचे मुख्याध्यापक भिकू बोर्ले, उपमुख्याध्यापिका विद्या पवार, पदवीधर शिक्षक नितेश हुंबरे आणि पदवीधर शिक्षिका मनिषा ठोंबरे यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी आदर, सामाजिक समता, बंधुता आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. प्रभात फेरीपासून ते संविधान गीतापर्यंत विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी संविधानाप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.















































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)

















































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.