संगमेश्वर : आयुष्याच्या वाटेवर संकटे अनेकांच्या वाट्याला येतात; मात्र त्या संकटांना शरण न जाता त्यांच्यावर मात करून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणारी माणसे समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. शारीरिक दिव्यांगत्व, प्रतिकूल परिस्थिती आणि संघर्षमय जीवनप्रवास यांवर दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द आणि अथक परिश्रमांच्या बळावर मात करत शिक्षणक्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी—शिवनेचे प्राचार्य प्रकाश भानुदास विरकर यांची महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने दिल्या जाणार्या प्रतिष्ठेच्या ‘राज्यस्तरीय कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२६’ साठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे संगमेश्वर तालुक्यासह बुरंबी पंचक्रोशी परिसरात आनंद, अभिमान आणि कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वयाच्या तिसर्या वर्षी पोलिओमुळे आलेल्या दिव्यांगत्वाने त्यांच्या जीवनाचा संघर्ष लहानपणीच सुरू झाला. पायातील शारीरिक मर्यादा, कॅलिपर्सचा आधार आणि दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी यांचा सामना करताना त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र परिस्थितीपुढे हार मानणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. शारीरिक मर्यादांना आपल्या स्वप्नांच्या आड येऊ न देता त्यांनी शिक्षणाची वाट धरली. जिद्द, आत्मविश्वास आणि कष्ट यांच्या जोरावर त्यांनी शिक्षणक्षेत्रात प्रवेश केला आणि शिक्षक म्हणून सुरू झालेला प्रवास प्राचार्य पदापर्यंत यशस्वीपणे पोहोचविला. त्यांचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीच्या यशाची कहाणी नाही, तर प्रतिकूल परिस्थितीतही स्वप्ने पाहण्याचे आणि ती सत्यात उतरविण्यासाठी संघर्ष करण्याचे सामर्थ्य देणारी प्रेरणागाथा आहे.
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी, रत्नागिरी येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत, राज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्यासह आमदार, लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रकाश विरकर यांच्या या निवडीबद्दल बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, शाळा समिती अध्यक्ष, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.















































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)

















































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.