loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी विद्यार्थ्यांकडून इन्सुली शाळेला गॅस शेगडी, कुकर भेट

बांदा (प्रतिनिधी) - इन्सुली परबवाडी येथील माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नं. ४ ला गॅस शेगडी आणि प्रेशर कुकर भेट दिला. विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहाराची व्यवस्था अधिक सुलभ व्हावी, या उद्देशाने लोकवर्गणीतून हा उपक्रम राबविण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेला पोषण आहार शिजवण्यासाठी आवश्यक साहित्याची गरज असल्याचे लक्षात येताच परबवाडीतील माजी विद्यार्थी व ग्रामस्थ एकत्र आले. त्यांनी लोकवर्गणी जमा करून गॅस शेगडी आणि कुकर खरेदी केले. एका छोटेखानी कार्यक्रमात हे साहित्य शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिवराम गावकर, विलास परब, रामा परब, दिलीप परब, आत्माराम नाईक, दशरथ धुरी, निलेश परब, अरुण परब, श्रीमती नाईक, रुक्मिणी वेटे आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले. या वेळी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, समिती पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg