loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यमंत्री ना. योगेश कदम यांचा २८ रोजी गुडघे येथे आपुलकीचा मुक्काम

खेड : दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा राज्यमंत्री ना. योगेशदादा कदम हे कोळबांद्रे जिल्हा परिषद गटातील पांगारी तर्फे हवेली गणातील गुडघे ब्राह्मणवाडी येथे शनिवार दि. २८ नोव्हेंबर रोजी आपुलकीचा मुक्काम करणार आहेत. आपल्या माणसांत, आपल्या वस्तीवर, या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून ते थेट ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी व विकासकामांचा आढावा घेणार आहेत. कोकणातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन समजून घेणे आणि प्रशासकीय व विकासकामांना गती देणे, हा या आपुलकीचा मुक्काम उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याआधी खेड तालुक्यातील आंबवली देऊळवाडी येथे २१ ऑक्टोबर रोजी राज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांनी आपुलकीचा मुक्काम करून तेथील ग्रामस्थांसोबत थेट संवाद साधला आहे. या दौऱ्यादरम्यान ना. योगेशदादा कदम हे गुडघे गावातील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांशी थेट संवाद साधणार असून गावातील मुलभूत सोयीसुविधा, रस्ते, पाणी, आरोग्य व इतर स्थानिक प्रश्नांवर ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. या उपक्रमामुळे ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होणार असून, त्यामुळे वंचित व दुर्गम भागातील समस्यांची तातडीने सोडवणूक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टाईम्स स्पेशल

संपूर्ण महाराष्ट्र राज्याची जबाबदारी असताना आपल्या दापोली मतदार संघातील जनतेशी जोडलेली नाळ अधिक दृढ व्हावी व मतदार संघातील प्रामुख्याने सर्व अडचणी दूर करता याव्यात. तसेच तळागाळातील प्रत्येक नागरिकाला आपला आमदार आपल्या हक्काचा माणूस ही भावना निर्माण होऊन आमदारांबरोबर निवांतपणे व मनमोकळेपणाने संवाद साधता यावा हा मुख्य हेतू या स्तुत्य उपक्रमा मागचा असून राज्यमंत्र्यांच्या शनिवारच्या या मुक्कामाच्या पार्श्वभूमीवर कोळबांद्रे गटात नागरिकांमध्ये तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg