loader
Breaking News
Breaking News
Foto

प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर इन्सुली रमाईनगर येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

इन्सुली - भीमगर्जना युवक मंडळ इन्सुली रमाईनगर यांच्या विद्यमाने प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर इन्सुली रमाईनगर येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विचार मंचावर मंडळाचे अध्यक्ष अरविंद जाधव, आनंद जाधव, वृषाली जाधव, संजना जाधव व धम्मचारी लोकदर्शी यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व संविधानाची प्रत पूजनाने भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आपल्या मनोगतामध्ये सुप्रिया जाधव, स्मृतिषा जाधव, सिद्धेश जाधव, आनंद जाधव, कृष्णा जाधव यांनी संविधान विषयी माहिती सांगितली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

धम्मचारी लोकदर्शी यांनी बोलताना संविधानामुळे मिळालेल्या मूलभूत अधिकाराची माहिती देऊन संविधानाचा आपण आदर केला पाहिजे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या लोकशाही मूल्यांची आपण संविधान दिनी स्मरण करणे आवश्यक आहे. भारतीय संविधानामुळे अनेक राज्य, वेगवेगळे धर्म, भाषा, जाती, पंथ, वेशभूषा, सामाजिक रितीरिवाज,परंपरा असूनही भारत एक संघ राष्ट्र बनले आहे; म्हणूनच भारतीय संविधान हे एक महान ग्रंथ असल्याचे प्रतिपादन धम्मचारी लोकदर्शी यांनी बोलताना केले. या कार्यक्रमात मिथिल जाधव, तेजस जाधव, दिपेश जाधव, अम्रित जाधव, सविता जाधव, अनुजा जाधव, दिपाली जाधव, भावना जाधव, प्रज्ञा जाधव, गीताली जाधव, लैला जाधव, मनिषा जाधव, वर्षा कदम इत्यादींची उपस्थिती होती. शेवटी अरविंद जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg