loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना (उबाठा) पक्षाची दापोली व गुहागर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न

खेड (प्रतिनिधी) - रायगड लोकसभा संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली खेड भरणेनाका येथील हॉटेल बिसू येथे आढावा बैठक संपन्न झाली. दापोली विधानसभा व गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या आढावा बैठकीत जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, जिल्हा सचिव अनिल जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोन्ही मतदारसंघाचा संघटनात्मक आढावा घेत असतानाच दुष्काळग्रस्त स्थिती व संभाव्य भीषण पाणीटंचाई यावर मात करण्याविषयी संजय कदम यांनी मार्गदर्शन केले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत व जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यावर अधिकाधिक लक्ष दिले जाईल, असे सांगितले. पक्षबांधणीच्या दृष्टीने नियोजित उपक्रमांची माहिती दिली. या आढावा बैठकीसाठी गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, युवासेना तालुका व शहर पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg