loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्याच्या कन्येची गगनभरारी; ‘नासा’ भेटीनंतर विधीचे गावात जल्लोषात स्वागत

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासा व विविध संस्थांना भेटी देऊन माघारी परतलेली लांजा तालुक्यातील जि.प. शाळा शिरवली शाळेची विद्यार्थिनी विधी विजय धुर्ये हिचे शिरवली गावात ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा परिषदेने ‘जाणू विज्ञान अनुभव विज्ञान’ या उपक्रमांतर्गत नासा व इस्रो भेट चाचणी परीक्षा असा उपक्रम राबवला. या परीक्षेत लांजा तालुक्यातून टॉपर्सना नासा व इस्रो भेटीची संधी उपलब्ध करून दिली. लांजा तालुक्यातून जि.प. शाळा शिरवली शाळेची विद्यार्थिनी विधी विजय धुर्ये हिची निवड झाली होती. दिनांक १२/११/ २६ ते २५ /११/ २६ असा अभ्यास दौरा करून हे विद्यार्थी परत आले. विधी शिरवली गावात पोचल्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी तिचे औक्षण केले. तर गावकर्‍यांनी जंगी स्वागत करून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. यावेळी गावकर्‍यांकडून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आदर्श विद्यामंदिर वाटूळ, हायस्कूल, जि. प. शाळा शिरवली येथे तिचे स्वागत, अभिनंदन करण्यात आले. यानंतर विधीच्या घरी स्वागत समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी विधीला मार्गदर्शन करणारे शिक्षक उमेश केसरकर, दळवी, रानोटकर, मुख्याध्यापक गोतावडे उपस्थित होते. वाडीप्रमुख रमेश राजापकर, ग्रामस्थ रामचंद्र भानू राजापकर, अन्वर रखांगी, महेंद्र राजापकर, संदीप सातोपे, संदीप सूद, दीपक मोडक, अनिल गोबरे, गोविंद सुद व ग्रामपंचायत सदस्य अश्लेषा गोबरे, विठ्ठल जाधव, अंगणवाडी कर्मचारी रश्मी राजापकर, कुडकर, शाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

खेडेगावातील मोलमजुरी करणार्‍या पालकांच्या मुलांना अमेरिका दौर्‍याची संधी मिळाली याबद्दल विधीने जी.प. रत्नागिरी व मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक, आई-वडील यांचे आभार मानले. याप्रसंगी विधीने अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रातील एटीएक्स प्रशिक्षण सहभाग, अंतराळस्थानकाची दुरुस्ती, ग्रहावरील खजिन्याचा शोध, अंतराळ यानातून प्रवास, अंतराळ प्रक्षेपण प्रणाली व नियंत्रण कक्षाची अनुभूती कथन केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg