loader
Breaking News
Breaking News
Foto

देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

रत्नागिरी (जमीर खलफे) : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये संविधान दिनानिमित्त नाटेकर हॉलमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केला. राष्ट्रीय सेवा योजना, इतिहास विभाग आणि आजीवन अध्ययन विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या सहकार्याने कार्यक्रम झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गौरवी भरणकर हिने भारतीय संविधानाचे महत्त्व नमूद केले. प्रचिती घाणेकर हिने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागातील पूर्वा सनगरे, गौरवी ओळकर आणि हिना परमार यांनी संविधानाविषयी सविस्तर माहिती देत संविधानाबद्दलचे आपले विचार मांडले.

टाईम्स स्पेशल

आजीवन अध्ययन विस्तार विभाग अर्थात (डी.एल.एल.ई.) या विभागातर्फे संविधान दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. चित्रे प्रदर्शित करण्यात आली. कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्य वसुंधरा जाधव, अंतर्गत गुणवत्ता कमी कक्ष समन्वयक प्रा. विनय बावदाने, इतिहास विभागप्रमुख प्रा. रिया बंडबे, आजीवन अध्ययन विस्तार विभागप्रमुख प्रा. राखी साळगावकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. मिथिला वाडेकर व तिन्ही शाखांचे विभागप्रमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन गौरवी ओळकर हिने केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg