loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा येथे एकता सामाजिक विकास ट्रस्टतर्फे वक्तृत्व व निबंध लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

म्हसळा : एकता सामाजिक विकास ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य वक्तृत्व व निबंध लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समीर बनकर होते. यावेळी एकता सामाजिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष शाहिद उकये, माजी नगराध्यक्षा कापडे मॅडम, न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य धरमचंद्र पाटील, प्राचार्य सोनवणे, शकूर घाणसर, युवा कार्यकर्ते सलीम बक्कर, मुदस्सिर हुज्जुक, इर्शाद बुडन, चव्हाण तसेच व्हिडिओ साहेबांचे प्रतिनिधी माली यांची प्रमुख उपस्थिती होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांमधील वक्तृत्वकला, लेखनकौशल्य, वैचारिक क्षमता आणि सामाजिक जाणीव विकसित व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा, अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूल, व्हिजन इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, आयडियल इंग्लिश स्कूल आणि शाईन उर्दू स्कूल या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेतील विविध गटांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी होऊनही पारितोषिकापासून थोडक्यात वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनाही सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रयत्नांचे कौतुक करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शाहनवाज शाहिद उकये यांनी केले होते. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. अशा शैक्षणिक व बौद्धिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच पुढील वर्षी यापेक्षाही अधिक व्यापक स्वरूपात आणि मोठ्या प्रमाणावर स्पर्धांचे आयोजन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा, त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन देणारा आणि शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, मान्यवरांची उपस्थिती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव यामुळे हा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg