loader
Breaking News
Breaking News
Foto

राठीवडे येथे वर्षावास धम्म प्रवचन संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण, महिला शाखा व संस्कार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास धम्म प्रवचन गाव शाखा राठीवडे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीप व धूप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी त्रिसरण व पंचशील ग्रहण केले. गाव शाखेच्या वतीने भगवान जाधव यांनी उपस्थित तालुका शाखेच्या सर्व पदाधिकारी व मान्यवरांचे स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वर्षावास धम्म प्रवचन मालिकेतील “अनित्य, अनात्मा व दुःख” या विषयावर केंद्रीय शिक्षक, माजी श्रामणेर, बौद्धाचार्य तथा जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजु यांनी धम्म प्रवचन केले. अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रभावी शैलीत त्यांनी अनित्य, अनात्मा व दुःख या विषयाची मांडणी करून उपस्थितांना धम्ममार्गदर्शन केले. यावेळी प्रवचनकार तथा जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजु, जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष (महिला शाखा) प्रितम जाधव, तालुका सरचिटणीस नचिकेत पवार, तालुका संस्कार उपाध्यक्ष सुर्यकांत कदम, सचिव मिलिंद पवार, सचिन कासले, संरक्षण सचिव गणेश कासले, तालुका माजी संरक्षण उपाध्यक्ष भगवान जाधव, वडाचापाटचे तुषण कासले तसेच गाव शाखा राठीवडेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, सचिव केतन कदम, कोषाध्यक्ष निखिल जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने उपासक-उपासिका उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी नचिकेत पवार व सूर्यकांत कदम यांनी कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार विभाग सचिव सचिन कासले यांनी केले. संस्कार सचिव मिलिंद पवार यांनी आभार मानले, तर गाव शाखेच्या वतीने भगवान जाधव यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg