loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पोलीस निरीक्षकांची भेट

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दोडामार्ग शहरच्या कार्यकारिणीच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पायर्श्वभूमीवर दोडामार्ग पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली. गणेशोत्सव काळात बाजारपेठेत होणार्‍या बेशिस्त वाहन पार्किंग संदर्भात आणि गणेश उत्सव काळात रस्त्याच्या कडेला वाहने पार्किंग करण्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी तसेच बाजारपेठ परिसरात वाहतूकीचे योग्य नियोजन करण्यात यावे आणि व्यापारासाठी येणार्‍या लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागू नये म्हणून योग्य नियोजन करण्याची मागणी करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच बाहेरून येणार्‍या प्रत्येक परप्रांतीयांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात यावे तसेच अनेक बांगलादेशी आणि रोहिंग्या याबाबत तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करण्यात यावी, या विषयांवर चर्चा करून भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप कोषाध्यक्ष स्वप्नील गवस, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र शेटकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पराशर सावंत, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ओमकार रेडकर, शहर उपाध्यक्ष राज बोन्द्रे, युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य आकाश नाईक, सुरज नाईक, श्रेयश गवस, भीमसेन नाईक, ओम तुमरे, महादेव तर्पे, शिवाजी नाईक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg