खेड आंबवली (प्रतिनिधी): पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कमिटी संचलित, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आंबवली (ता. खेड, जि. रत्नागिरी) विद्यालयात "एक राखी शूर जवानांसाठी, सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिक भावासाठी" हा उपक्रम अत्यंत उत्साहात, भावुक आणि देशप्रेमाने प्रेरित वातावरणात पार पडला. भारतीय टपाल खात्याच्या विशेष सौजन्याने आणि सहकार्याने या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका एडवोकेट यादव, पोस्ट ऑफिस कडून उपस्थित असलेले प्रवीण देसले, प्रियंका अडसूळ, रिया यादव, शिवानी जगताप, रूपाली वाघ, हनुमान गुले, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपले कुटुंब सोडून अहोरात्र सीमेवर तैनात राहणाऱ्या शूर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्वतःच्या कल्पकतेने व हाताने सुबक, आकर्षक राख्या तयार केल्या. राख्यांसोबतच विद्यार्थ्यांनी सैनिकांच्या शौर्याला सलाम करणारे आपुलकीचे आणि प्रेरणादायी शुभेच्छा संदेश पत्रेही पाठवली. विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने सुंदर राख्या तयार करून आणि शुभेच्छा संदेश लिहून सैनिक भावांप्रती प्रेम व्यक्त केले. आंबवली विभागातील टपाल खात्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून राख्या सीमेवर सुरक्षित व वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारली. संस्थेकडून तसेच आंबवली विभागातील सर्व ग्रामस्थ व नागरिकांकडून या स्तुत्य उपक्रमास व सीमेवरील जवानांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने अत्यंत उत्कृष्ट व नियोजनबद्ध रीतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय प्रास्ताविकातून बोलताना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड. प्रियंका यादव यांनी या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, "ज्या शूर जवानांमुळे आपण आपल्या घरात सुरक्षित आणि शांततेत सण-उत्सव साजरे करू शकतो, त्या जवानांच्या हातावर आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रेमाची राखी सजणे हा अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे." यासोबतच त्यांनी भारतीय टपाल खात्याचे हार्दिक स्वागत करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान आंबवली विभागातील टपाल खात्याच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.













































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.