रत्नागिरी, (वार्ताहर) - पाचा लिंबाचा पानोठा..... माळ घालू हनुमंता....हनुमंताची निळी घोडी..... येता जाता कमळे तोडी.....अशी मंगळागौरीची पारंपारिक गाणी म्हणत श्रीराम मंदिर संस्था आयोजित मंगळागौर स्पर्धा महिलांनी आपल्या पारंपारिक नृत्याने जागवली. सालाबादप्रमाणे यावषीदेखील श्रीराम मंदिर संस्थेच्यावतीने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी या स्पर्धेचा थाटामाठात शुभारंभ झाला. वर्षभर या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहणार्या सख्यांनी पहिल्याच दिवशी ही स्पर्धा अक्षरशः गाजवली. श्रावण महिन्याचे औचित्य साधून श्री राम मंदिर संस्था, रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मंगळागौर स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक खेळ, फुगड्या आणि सांस्कृतिक सादरीकरणातून महिलांनी मराठी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवले. श्रावणातील मंगळागौर हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाचा उत्सव मानला जातो. या परंपरेचे जतन व्हावे तसेच महिलांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने श्री राम मंदिर संस्थेच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत सहभागी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत विविध मंगळागौरीचे खेळ, फुगड्या तसेच सांस्कृतिक सादरीकरण केले. यावेळी महिलांच्या उत्साहाने संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक खेळांच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने उपस्थितांनीही या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने महिलांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. पारंपरिक लोककला आणि संस्कृती जपण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. श्रावणातील मंगलमय वातावरणात रंगलेल्या या मंगळागौर स्पर्धेने रत्नागिरीत मराठी संस्कृती आणि परंपरेचा जागर घडवून आणला.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सौ. वैजयंती पाटील, सौ. जानव्ही दळवी, सौ. अर्चना उतेकर, सौ. मंदा चौघुले, सौ. प्रतिक्षा साळवी, सौ. नंदीनी चाकणे, सौ. वैशाली नेवरेकर, सौ. सुरेखा घारपडे, श्रीमती शितळ घारपडे, श्रीमती राजेश्री लोटणकर, सौ. विशाखा सुर्वे, सौ. विशाखा सावंत, सौ. यज्ञा विरकर, सौ. माया तांबे, सौ. शुभांगी भावे, यांच्यासह श्रीराम मंदिर संस्थेचे सुनिल नलावडे, नित्यानंद दळवी, उपेंद्र सुर्वे, संतोष रेडीज, संदीप डोंगरे, विनायक हातखंबकर, अनिल नागवेकर, रमाकांत पांचाळ, राजाराम सुर्वे, दिपक देसाई, दिपक राऊत आदी अथक परिश्रम घेत आहेत.



































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.