loader
Breaking News
Breaking News
Foto

विवली-केळंबे गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सिराज नेवरेकर यांची फेरनिवड

केळंबे-लांजा (वार्ताहर) - लांजा तालुक्यातील केळंबे-विवली गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार सिराज नेवरेकर यांची तर उपाध्यक्षपदी तातु खानविलकर, सचिव पदी भिकाजी कांबळे यांची सर्वानुमते बिनविरोध फेर निवड करण्यात आली. विवली-केळंबे ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा प्रशासक दीपाली कांबळे, अध्यक्ष सचिन विभुते यांच्या अध्यक्षतेखालील सोमवार दीनांक 24ऑगस्ट रोजी पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निवड करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी सर्वानुमते सिराज नेवरेकर यांचे नाव घेण्यात आले. तसेच गावातील विकास कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक रसिका कांबळे. माजी सरपंच संपतराव खानविलकर, रामदास खानविलकर, अभिजीत राजेशिर्के, संजय शेलार, पांड्या वालकर, अशोक विचारे, माजी सरपंच बापू खानविलकर, कैलास खानविलकर, वैभव धनावडे, विलास शेलार, पोलीस पाटील रोहीत कांबळे, सिताराम लांबोरे, मनोज पवार आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सिराज नेवरेकर यांच्यासह सर्व समिती पदाधिका-यांचे अभिनंदन केले जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg