loader
Breaking News
Breaking News
Foto

जानवळे गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी अंतिम संसारे यांची बिनविरोध निवड

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : गुहागर तालुक्यातील जानवळे गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अंतिम संसारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गावातील सामाजिक सलोखा, शांतता आणि एकोपा कायम राखण्यासाठी तंटामुक्त समितीची भूमिका महत्त्वाची असून, या पार्श्वभूमीवर संसारे यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गावातील विविध सामाजिक प्रश्न तसेच आपापसांतील वादविवाद सामोपचाराने सोडविणे, ग्रामस्थांमध्ये सलोखा निर्माण करणे आणि गावातील शांततापूर्ण वातावरण टिकवून ठेवण्यासाठी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. अंतिम संसारे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जानवळे गाव अधिक तंटामुक्त आणि एकोप्याचे गाव म्हणून पुढे यावे, अशा शुभेच्छा ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg