loader
Breaking News
Breaking News
Foto

अतिदुर्गम पन्हाळजे केंद्रातील शाळांमध्ये लायन्स क्लब ऑफ खेड सिटीतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

खेड, (प्रतिनिधी) - ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ खेड सिटीतर्फे राबविण्यात येणाऱ्या शालेय उपयोगी साहित्य वाटप उपक्रमांतर्गत पन्हाळजे केंद्रातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत माजी अध्यक्ष ला. रोहन विचारे, माजी अध्यक्ष ला. महेंद्र शिरगावकर, अध्यक्ष ला. अविनाश दळवी आणि खजिनदार ला. संदीप मोरे यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद शाळा बहिरवली मराठी, होडखाड मराठी, होडखाड दत्तवाडी, पन्हाळजे सुतार बौद्ध, पन्हाळजे मराठी, पन्हाळजे उर्दू तसेच मुंबके उर्दू-मराठी शाळा येथील विद्यार्थ्यांना वही, पेन्सिल, पाऊच तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर उपक्रम लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष ला. अविनाश दळवी तसेच लायन्स क्लब युनिटी, चिपळूणच्या सभासद रिद्धी (ऋतुजा) अविनाश दळवी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ला. अविनाश दळवी व रिद्धी (ऋतुजा) दळवी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून मेहनत, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्ष ला. अविनाश दळवी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “गेल्या पाच वर्षांपासून लायन्स क्लब ऑफ खेड सिटीतर्फे हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून दरवर्षी शंभरहून अधिक शाळांमध्ये शालेय उपयोगी साहित्याचे वाटप केले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागावा हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.”

टाईम्स स्पेशल

या प्रसंगी बहिरवली, पन्हाळजे, होडखाड आणि मुंबके परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी लायन्स क्लबच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करत इतक्या दुर्गम भागात येऊन विद्यार्थ्यांसाठी कार्य केल्याबद्दल लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह आणि समाधान पाहून हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg