loader
Breaking News
Breaking News
Foto

गोडबोले विद्यामंदिरात जलसंधारण सप्ताह

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या केळ्ये गावातील शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यालयात जल संधारण सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा पाटील, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिन जलसंवर्धन दिन म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने घोषित केले आहे. त्याला अनुसरून विद्यालयांमध्ये जलसंवर्धन दिन साजरा करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाची व मृदा संधारणाची प्रतिज्ञा म्हटली. शिक्षिका श्रुती रहाटे यांनी विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाची व मृदा संधारणाची आवश्यकता स्पष्ट करणारे मार्गदर्शन केले. शिक्षिका अनघा रसाळ यांनी आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg