loader
Breaking News
Breaking News
Foto

वीजेचा धक्का लागून पडलेल्या माकडाच्या पिल्लाला जीवदान

मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरातील भरड नाका येथील दत्त मंदिराजवळ सोमवारी सकाळी वीजेचा धक्का लागून माकडाचे एक पिल्लू खाली पडल्याची घटना घडली. जखमी अवस्थेत पडलेल्या या पिल्लाला स्थानिकांच्या तत्परतेमुळे वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचवण्यात यश आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही घटना भरड येथील स्थानिक व्यावसायिक राजन बादेकर यांच्या दुकानासमोर घडली. माकडाचे पिल्लू वीजेच्या धक्क्याने खाली पडल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने श्रीराज बादेकर यांच्याशी संपर्क साधला. श्रीराज बादेकर यांनी घटनास्थळी धाव घेत वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. दरम्यान, प्राणीमित्र तेजस नार्वेकर तसेच डॉ. रमाकांत गावकर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या माकडाच्या पिल्लावर तातडीने प्राथमिक उपचार सुरू केले.

टाईम्स स्पेशल

वनविभागाचे RRT अधिकारी केदार हडकर हे देखील घटनास्थळी उपस्थित झाले. पिल्लाची प्रकृती लक्षात घेऊन पुढील उपचारांसाठी त्याला कट्टा येथे नेण्यात आले. स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तसेच प्राणीमित्र आणि वनविभागाच्या सहकार्यामुळे जखमी माकडाच्या पिल्लाला वेळीच उपचार मिळाले. यावेळी श्रीराज बादेकर, राजन बादेकर, प्रसाद हळदणकर, अदिती आचरेकर यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व प्राणीमित्र उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg