loader
Breaking News
Breaking News
Foto

सणासुदीतही शेतकरी मदतीपासून वंचित; पीक नुकसान भरपाई आणि कर्जमाफी योजनेतील जाचक अटींमुळे बळीराजा हतबल

दापोली (वार्ताहर) : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच संकटात सापडले आहेत. त्यातच आता शासनाकडून जाहीर झालेली तुटपुंजी मदत मिळण्यातही विलंब होत असल्याने जगाचा पोशिंदा हतबल झाला आहे. पंचक्रोशीत आंबा व काजू नुकसान भरपाईपोटी प्रति हेक्टरी २२ हजार ५०० रुपये शासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांनी ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करून आज २५ दिवस उलटून गेले, तरी अद्याप त्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एकीकडे सणासुदीचा काळ जवळ आला असताना हाती पैसा नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या गंभीर प्रश्नाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावी, अशी आर्त हाक शेतकऱ्यांकडून दिली जात आहे. नुकसान भरपाईसोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेबाबतही शेतकऱ्यांमध्ये सध्या मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या योजनेची जाहीर झालेली तारीख उलटून गेली असून, आतापर्यंत केवळ यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कर्जमाफी प्रक्रियेत फार्मर आयडी (Farmer ID) सक्तीचा केल्यामुळे अनेक छोट्या आणि गरजू शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे चित्र आहे.

टाईम्स स्पेशल

अनेक वर्षांपूर्वी कर्ज घेतलेल्या पन्नास टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांकडे शेतीचे सातबारा उतारे नाहीत. पूर्वी कर्ज घेताना सातबारा उताऱ्याची अट नव्हती, केवळ शेतीमाल विक्री करतो अशा सरपंचाच्या दाखल्यावर २५ हजार रुपयांपर्यंतचे शेती कर्ज बँका देत असत. काही जणांचे हे कर्ज यापूर्वी माफही झाले होते. मात्र, आता फार्मर आयडी बंधनकारक केल्यामुळे या जुन्या व अल्पभूधारक कर्जदारांची नावे कर्जमाफीच्या यादीत येऊनही त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. या जाचक अटींमुळे अनेक गरजू शेतकरी कर्जमाफीपासून कायमचे वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली असून, राज्य सरकारने यावर तातडीने योग्य ती उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg