रत्नागिरी: कोकणातील ग्रामीण भागाला सुरळीत, अखंडित आणि भरवशाचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी घेतलेल्या विशेष व अथक प्रयत्नांना मोठे यश आलेले आहे. जानेवारी २०२४ पासून जुलै २०२६ या अडीच वर्षांच्या कालावधीत महावितरण कंपनीच्या माध्यमातून या विधानसभा मतदारसंघांतर्गत ऐतिहासिक स्वरूपाची वीज सुधारणा व विस्ताराची कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहेत. कोकणातील भौगोलिक परिस्थिती आणि पावसाळ्याचे आव्हान लक्षात घेता, नागरिकांना वीज पुरवठ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आमदार किरण सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा करून ही भरीव कामे मार्गी लावली आहेत.
या सर्वसमावेशक विकासकामांतर्गत देवरुख, लांजा, राजापूर १ आणि राजापूर २ या उपविभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर जुन्या व जीर्ण यंत्रणेचे नुतनीकरण करण्यात आले आहे. वीज पुरवठा अधिक सुरक्षित व्हावा यासाठी देवरुख उपविभागात ४७८, लांजा उपविभागात ५२८, राजापूर १ मध्ये ४९२ तर राजापूर २ उपविभागात ३०० असे एकूण मिळून अनेक गंजलेले लघुदाब खांब तातडीने बदलण्यात आले आहेत. याशिवाय दोन्ही भागांतील उच्चदाब वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी देवरुखमध्ये ९८, लांजा उपविभागात ६७, राजापूर १ मध्ये ७८ आणि राजापूर २ उपविभागात ७५ गंजलेले उच्चदाब खांब बदलण्याचे महत्त्वपूर्ण काम पूर्ण करण्यात आले आहे. वीज वितरणाचा कणा मानल्या जाणाऱ्या डीपी स्ट्रक्चर्समधील गंजलेले खांब बदलण्याबाबतही विशेष लक्ष दिले गेले असून, देवरुखमध्ये ४, लांजा मध्ये ७, राजापूर १ मध्ये ६ आणि राजापूर २ मध्ये ८ गंजलेले डीपी स्ट्रक्चर्स बदलण्यात आले आहेत. वीज वाहिन्यांच्या सक्षमीकरणासाठी नवीन लघुदाब वाहिनी आणि नवीन उच्चदाब वाहिनी टाकण्याचे मोठे जाळे मतदारसंघात उभारण्यात आले आहे. यादरम्यान देवरुखमध्ये २५ किमी, लांजा उपविभागात ३० किमी, राजापूर १ मध्ये २८ किमी आणि राजापूर २ मध्ये २७ किमी लांबीची नवीन लघुदाब वाहिनी टाकण्यात आली आहे.
तसेच उच्चदाब वाहिनीच्या विस्तारांतर्गत देवरुखमध्ये ५ किमी, लांजा मध्ये ७ किमी, राजापूर १ मध्ये ६ किमी आणि राजापूर २ उपविभागात ८ किमी नवीन उच्चदाब वाहिनी टाकण्यात आली आहे. वाढत्या वीजभारामुळे होणारी ट्रिपिंगची समस्या सोडवण्यासाठी नवीन रोहित्रांची उभारणी करण्यात आली असून, यामध्ये देवरुखमध्ये १३, लांजा मध्ये १५, राजापूर १ मध्ये १२ आणि राजापूर २ उपविभागात १० नवीन रोहित्र बसवण्यात आले आहेत. याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत वीज ग्राहकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम यशस्वीरीत्या राबवण्यात आली आहे. यामध्ये देवरुख उपविभागात ७,७००, लांजा मध्ये ९,१००, राजापूर १ मध्ये ७,००० आणि राजापूर २ उपविभागात १०,८०० एवढ्या मोठ्या संख्येने स्मार्ट मीटर यशस्वीपणे बसवण्यात आले आहेत. आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या या धडाडीच्या व लोककल्याणकारी पाठपुराव्यामुळे लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघाचा वीजप्रश्न दीर्घकाळसाठी मार्गी लागला असून, नागरिकांमधून त्यांचे सर्वत्र आभार मानले जात आहेत.





















































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.