loader
Breaking News
Breaking News
Foto

संदीप नाखरेकर यांची केळये तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड

रत्नागिरी : युवासेनेचे सक्रिय कार्यकर्ते आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले संदीप नाखरेकर यांची केळये गावाच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गावातील शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यात त्यांनी बजावलेल्या कामगिरीची दखल घेत ग्रामस्थांनी त्यांच्यावर ही जबाबदारी पुन्हा सोपवली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संदीप नाखरेकर यांच्या संयमी आणि सर्वसमावेशक नेतृत्वामुळे गावातील अनेक वाद-विवाद सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल केळये गाव आणि परिसरातून आनंद व्यक्त केला जात असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गावाच्या विकासासोबतच तंटामुक्त गाव मोहिमेला अधिक बळ देण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना यावेळी संदीप नाखरेकर यांनी व्यक्त केली. त्यांच्या पुढील वाटचालीस ग्रामस्थ, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उदंड शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg