loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्जतमधील शारदा शाळेची दमदार कामगिरी, सहा खेळाडूंची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड

कर्जत, (जयेश जाधव) : नुकताच दादर परेल येथे झालेल्या ओपन महाराष्ट्र स्टेट लेवल तायक्वांडो चॅम्पियनशिप स्पर्धा दादर परेल येथे शारदा मंदिरच्या सहा खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या सर्व खेळाडूंनी सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई करत गोवा येथे होणाऱ्या तायक्वांडो चॅम्पियनशिप स्पर्धेत निवड झाली आहे. शारदा मंदिरच्या खेळाडूंनी यश प्राप्त करून स्वतःचे व शाळेचे नाव उज्वल केले असून या यशस्वी खेळाडूंच्या यशामुळेच रायगड जिल्ह्याला संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकचे मानकरी ठरवले गेले आहे. या यशस्वी खेळाडूंचे महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल सावंत, साटम, सावंत, सौरभ सावंत यांनी कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याचे जाहीर केले आहे व शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या यशस्वी खेळाडूंच्या यशामागे शारदा मंदिर शाळेचे शारीरिक शिक्षण शिक्षक सौरभ गुरव यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले आहे. यामध्ये विहान पेरणेकर - सुवर्ण पदक, रोनक अंबावणे - सुवर्ण पदक, इंदवी पोले - सुवर्ण पदक, स्वराज पोले - सुवर्ण पदक, अथर्व नागे - सुवर्ण पदक, हर्षवर्धन पोले - रौप्य पदक, माही चौहान - रौप्य पदक, श्रेयस शिंदे - रौप्य पदक, विनंती खडके - कांस्य पदक, आर्या भालेराव - कांस्य पदक, ध्रुव बडे कांस्य पदक तसेच सेमी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका अंजली किसवे आणि इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका छाया नगरकर व शिक्षक वृंद यांनी शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg