संगमेश्वर (प्रतिनिधी) - सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय गेली १४ वर्षे राज्यातील साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्य कृतीना राज्यस्तरीय अक्षरगौरव पुरस्कार देवून सन्मानीत करत आहे. लिहित्या हातांचा सन्मान करणे आणि यामध्ये सलग चौदा वर्षे सातत्य राखणे हे कौतुकास्पद आहे. म्हणूनच अश्वमेध ग्रंथालयाचे साहित्य क्षेत्रातील योगदान अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी - गझलकार धनंजय तडवळकर यांनी केले. सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय आणि वाचनालयाच्या वतीने दरवर्षी कै. भास्करराव माने राज्यस्तरीय अक्षरगौरव साहित्य पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या सातारा येथील सोमण सभागृहात संपन्न झालेल्या अक्षर साहित्य गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून तडवळकर हे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर ज्येष्ठ कवियत्री ज्योत्स्ना चांदगुडे, वाचनालायचे संस्थापक रवींद्र भारती, अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने, कार्यवाह शशिभूषण जाधव, श्रीधर साळुंखे आदि मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित दोन्ही मान्यवर प्रमुख पाहुण्यांचा अश्वमेधच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देवून सन्मान करण्यात आला. अश्वमेधचे संस्थापक रवींद्र भारती यांनी ग्रंथालय कार्याचा आढावा घेताना सांगितले की, आमचे ग्रंथालय विनाअनुदानित असले तरी वर्षभरात आम्ही विविध उपक्रम घेत असतो. गेली १४ वर्षे राज्यातील साहित्यिकांना पुरस्कार देण्यामध्ये माने कुटुंबियांचे योगदान खूप मोठे आहे. प्रास्ताविकात डॉ. राजेंद्र माने म्हणाले की, यावर्षी अश्वमेधकडे एकूण १२३ ग्रंथ पुरस्कारासाठी प्राप्त झाले. निवड समितीने कस लावून विविध विषयावरील ग्रंथाची पुरस्कारासाठी निवड केली. यातील काही पुस्तकांचा डॉ. राजेंद्र माने यांनी विशेष उल्लेख केला. आमची पुरस्काराची रक्कम छोटी असली तरी, अधिकाधिक साहित्यिकांना पुरस्कार दिले जावेत, असा आमचा यामागील प्रामाणिक हेतू असल्याचे डॉ. माने यांनी स्पष्ट केलं.
गेली ११ वर्षे दर रविवारी एक लेख लिहिणारे आणि चपराक प्रकाशनच्या माध्यमातून आजवर चौदा पुस्तकांची निर्मिती करणारे संगमेश्वर येथील लेखक जे. डी. पराडकर यांच्या ' ऋतुरंग ' या कोकणातील फुलांविषयीच्या रंगीत पुस्तकाला अश्वमेधचा राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल उपस्थितांच्या हस्ते त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना जे. डी.पराडकर म्हणाले की, हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून पुस्तकाची निर्मिती करणारे चपराक प्रकाशन, संपादक घनश्याम पाटील, मुखपृष्ठ रेखाटणारे चित्रकार विष्णू परीट, पुस्तकासाठी प्रस्तावना देणारे डॉ. उमेश मुंडल्ये पाठराखण करणाऱ्या तत्कालीन कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे आणि सर्व वाचक यांचा आहे. ऋतुरंग या आगळ्यावेगळ्या रंगीत पुस्तकाची अश्वमेध ग्रंथालयाने दखल घेतल्याबद्दल पराडकर यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.





















































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.