खेड : खेड-दापोली मार्गावरील दस्तुरी फाटा येथे टेम्पो ट्रॅव्हलरमधील प्रवाशांनी एका स्थानिक नागरिकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बंद पडलेला ट्रक टोईंग करून रस्त्याच्या बाजूला घेण्याचे काम सुरू असताना टोईंग केलेला भाग सुटत असल्याचे एका स्थानिक नागरिकाने निदर्शनास आणून दिले. यावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरमधील प्रवाशांनी संबंधित नागरिकाला बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. या मारहाणीत त्याच्या डोक्याला दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
यानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी एकत्र येत टेम्पो ट्रॅव्हलरची काच फोडली. त्यामुळे खेड-दापोली मार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस स्थानकाचे काही कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असतानाही या संपूर्ण प्रकाराबाबत खेड पोलीस स्थानकात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नसल्याचे समोर येत आहे. एवढी मोठी मारामारी, रक्तस्त्राव आणि वाहनाची तोडफोड झाल्यानंतरही तक्रार दाखल न झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आपापसातील तडजोडीनंतर हे प्रकरण मिटवण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे आता खेड तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल होऊनही तक्रार नोंदवली जात नसेल, तर कायदा हातात घेणाऱ्यांवर पोलिसांचा धाक राहिला आहे का, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणातील संबंधित व्यक्तींवर तसेच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. मारहाण, वाहनाची तोडफोड आणि त्यानंतर तडजोडीने प्रकरण मिटवले जात असेल, तर खेड तालुक्यात कायदा-सुव्यवस्था नेमकी कोणाच्या हातात आहे? हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.























































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.