loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली ते खेड महामार्गावर उनाड गुरांचा रस्ता रोको; वाहनचालक त्रस्त

संगलट (खेड)(इक्बाल जमादार) - दापोली ते खेड महामार्गावर काळकाईकोंड परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ तसेच मल्हार पेट्रोल पंपजवळ उनाड गुरांनी चोहोबाजूने रस्ता अडवून धरल्याची घटना समोर आली आहे. महामार्गाच्या मधोमध गुरांचे कळप उभे राहिल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती आणि वाहनचालकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणातील प्रमुख मार्गांपैकी एका असलेल्या दापोली-खेड मार्गावर पाळीव जनावरे सोडून देण्याचे प्रमाण वाढले आहे. ही जनावरे दिवसभर रस्त्यावरच रेंगाळत असतात, ज्यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा वळणांच्या रस्त्यांवर अचानक गुरे समोर आल्याने अनेक दुचाकीस्वारांना गंभीर अपघातांना सामोरे जावे लागत आहे. वाहनचालक व नागरिकांची मागणी काळकाईकोंड येथील या प्रकारानंतर स्थानिकांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

टाईम्स स्पेशल

रस्त्यावर उनाड फिरणाऱ्या गुरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी आणि या जनावरांना गोशाळेत किंवा सुरक्षित ठिकाणी हालवण्यात यावे, अशी आक्रमक भूमिका वाहनचालकांनी घेतली आहे. "प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपाययोजना करावी, जेणेकरून संभाव्य मोठा अपघात टाळता येईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg