loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र सरकारने मराठी शाळा बंद करण्याचा निर्णयाविरोधात ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत निघणार महामोर्चा

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - महाराष्ट्र सरकारने गाव खेडयातील शहरातील मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. मराठी शाळा बंद झाल्या तर याचे गंभीर परिणाम ग्रामीण भागातील मुलांना भोगावे लागणार आहे. शाळा टिकल्या तर गाव टिकतील, शिक्षण वाचले तरच भविष्य घडेल. सरकारच्या मराठी शाळा बंद धोरणाला विरोध करण्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर मोठे आंदोलन होणार आहे. या बाबत दोडामार्ग येथे झालेल्या बैठकीत दोडामार्ग मधून दोनशेपेक्षा जास्त पालक नागरिक सहभागी होणार असल्याचे ठरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यातील मराठी शाळा वाचवण्यासाठी अनेक शिक्षक पालक समिती, सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेत शाळा वाचल्या पाहिजे, आपली मराठी मातृभाषा येणार्‍या प्रत्येक पिढीला आत्मसात झाली पाहिजे यासाठी पुढाकार घेत आहेत. यासाठी एक समिती गठीत केली आहे. या समितीच्या वतीने गावागावात बैठक घेतली जात आहे. दोडामार्ग न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी शनिवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत मुंबई येथे होणार्‍या आंदोलनात दोडामार्ग मधून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी झाले पाहिजे यावर चर्चा झाली. यावेळी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर यांनी आंदोलनामागची भूमिका मांडली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg