loader
Breaking News
Breaking News
Foto

सांखवाळच्या राधे कृष्णा एन्टरटेन्मेंटतर्फे चिपळूणमध्ये रंगणार ऐतिहासिक गोवळकोटचा रणसंग्राम लघू महानाट्य

सांखवाळ, दक्षिण गोवा : सरनोबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने नरवीर सरनोबत आनंदराव गोळे यांच्या २९३ व्या स्मृतिदिनानिमित्त एका ऐतिहासिक लघू महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. ०५ ऑक्टोबर १७३३ रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशानुसार मराठ्यांनी सिद्धीला दिलेला पराक्रमी सामना आणि सरनोबत नरवीर आनंदराव गोळे व त्यांच्या १० बंधूंचे स्वराज्यासाठी दिलेले बलिदान अजरामर करणार्‍या गोवळकोटचा रणसंग्राम या पहिल्या लघू महानाट्याचे सादरीकरण चिपळूण येथे होणार आहे. राधे कृष्णा एन्टरटेन्मेंट, सांखवाळ दक्षिण गोवा यांच्या वतीने आणि युवा नाट्य दिग्दर्शक व निर्माता अमित दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे महानाट्य सादर केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शुक्रवार, दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी मडगाव रेल्वेस्थानकावरून चिपळूण (रत्नागिरी, महाराष्ट्र) येथे प्रस्थान. दुसर्‍या दिवशी शनिवार, ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ०६:०० वाजता. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सभागृह, चिपळूण, येथे हा पार पडणार आहे. सांखवाळ गावच्या मराठमोळ्या रणरागिणी कलाकर्मी, शालेय विद्यार्थिनींसह जवळपास ५५ भगिनी आणि बालकलाकार या प्रयोगात सहभागी होत आहेत. गोमंतकातील मराठ्यांच्या नसानसात भिनलेली स्वराज्याविषयीची तळमळ आणि अतुट शिवप्रेम या नाट्य प्रयोगातून दिसून येणार आहे. या भव्य प्रवासात वर्ष ०१ ते वर्ष ७४ वयोगटातील कलाकार रत्नागिरीच्या भूमीत सादरीकरण करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. या फौजफाट्यात शिल्पा नाईक, भारती नाईक, अनुराधा नाईक, अनुजा नाईक, प्रणीता बोरकर यांचा सहभाग आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg