loader
Breaking News
Breaking News
Foto

योगेश कदम यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू दे! गणपती विसर्जनावेळी संजय मोदींचे गणरायाकडे साकडे

खेड - गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी खेड शहर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तथा खेड नगरपरिषदेचे नगरसेवक संजय मोदी यांनी गणरायाकडे विविध मागण्यांचे साकडे घातले. यामध्ये खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री योगेश कदम यांना आगामी काळात कॅबिनेट मंत्रीपद मिळावे, अशी विशेष प्रार्थना करण्यात आली. सालाबादप्रमाणे खेड शहर शिवसेनेच्या वतीने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. अकरा दिवसांच्या गणेशोत्सव काळात कार्यकर्ते आणि गणेशभक्तांकडून काही चूकभूल झाली असल्यास ती मान्य करून घ्यावी, अशी विनंतीही संजय मोदी यांनी बाप्पाकडे केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जनसेवेचे बळ मिळावे आणि शिवसेना नेते, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना करण्यात आली. खेड नगरपरिषदेत मिळालेल्या २१-० अशा निर्विवाद विजयाचा उल्लेख करत, आगामी सर्व निवडणुकांमध्येही असेच यश मिळावे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गणरायाचा सुख, समृद्धी आणि आनंदाचा आशीर्वाद सदैव राहावा, अशी मनोकामना यावेळी व्यक्त करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg