loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. बहुतांश मतदारसंघांमध्ये तडजोडीचा मार्ग काढण्याचे प्रयत्न होत असले तरी खेड तालुक्यातील शेती संस्था मतदारसंघात मात्र निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सभापती अण्णा कदम निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणांकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे विद्यमान बँक उपाध्यक्ष बाबाजी जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे कदम यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे जाधव यांच्यासमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेडच्या शेती संस्था मतदारसंघात एकूण ४३ मते असून, मतदारसंख्या कमी असली तरी बँकेच्या निवडणुकीत या मतदारसंघाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अण्णा कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास विद्यमान उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांचे अनेक वर्षांचे प्रतिनिधित्व कायम राहणार की या मतदारसंघात नवा राजकीय अध्याय सुरू होणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक शक्यतो बिनविरोध व्हावी यासाठी विविध राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र खेड शेती संस्था मतदारसंघातील संभाव्य लढतीमुळे बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अण्णा कदम यांच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय आणि बाबाजी जाधव यांची भूमिका याकडे सहकार क्षेत्रासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg