loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तालुक्यातील कळणे जि. प. शाळेतील तरूण शिक्षकाच्या निधनामुळे हळहळ

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - कळणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ चे मुख्याध्यापक प्रभाकर राठोड यांचे काल सायंकाळी सावंतवाडीहून दोडामार्गच्या दिशेने येताना वाटेत माझगाव येथे वयाच्या ४०-४५ शीतील या उमद्या व्यक्तिमत्वाच्या महत्वकांक्षी, हरहुन्नरी, आदर्श शिक्षकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाल्याने शिक्षकवर्गात, कळणे गावात शोककळा पसरून आहे. या घटनेनंतर समस्त कळणेवासियांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या आकस्मिक निधनाची दुःखद बातमी ऐकून शाळेतील विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रूं दाटले. प्रभाकर राठोड हे खूपच तरुण वयाचे असून त्यांच्या सुस्वभावी, हसतमुख, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, प्रगतीच्या ध्येयाने झपाटलेले, प्रभावी, उत्कृष्ट वकृत्व, हसत खेळत शिकवणे म्हणून ओळख असलेल्या या व्यक्तिमत्वानी अवघ्या दीड दोन वर्षातच त्यांनी विद्यार्थ्यांना आपलेसे करून घेतले होते. पालकांना त्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर होता.

टाईम्स स्पेशल

समस्त कळणेवासिय प्रभाकर राठोड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या पुण्यात्म्यांस ईश्वर चिरशांती आणि सदगती देवो, ही प्रार्थना करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. शिक्षक प्रभाकर राठोड यांनी दोडामार्ग तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक ते मुख्याध्यापक पर्यंत मजल माजली. ते नेहमीच सर्वांशी हसत खेळत असत म्हणून ते दोडामार्गमध्ये विद्यार्थीवर्गात परिचित होते. त्यांच्या या आकस्मित निधनामुळे दोडामार्ग तालुक्यातील शिक्षक वर्गातून शोक व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg