म्हसळा - शिवसेना युवासेनेच्या वतीने मेंदडी व मेंदडी कोंड परिसरातील घरगुती गणेशोत्सवातील मखर सजावटीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या “घरगुती गणपती मखर सजावट स्पर्धा–२०२६” ला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक संस्कृती, कलात्मकता, पर्यावरणपूरक सजावट आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम या स्पर्धेत पाहायला मिळाला. या स्पर्धेचा निकाल निःपक्षपणे व पारदर्शक पद्धतीने जाहीर करण्याचा आयोजकांकडून पूर्ण प्रयत्न करण्यात आला.
स्पर्धेच्या निकालामध्ये प्रथम क्रमांक कुशल शशिकांत पाटील, द्वितीय क्रमांक किशोर बाळ्या कांबळे आणि तृतीय क्रमांक नारायण जाण्या चिपोळकर यांनी पटकावला. तसेच सर्वोत्कृष्ट गणेशमूर्तीचा पुरस्कार राहुल अरुण पेरवी यांना देण्यात आला. याशिवाय स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग नोंदविणाऱ्या विविध स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके व सन्मानचिन्हे देण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील मकर सजावटीतून कल्पकता, मेहनत आणि गणेशोत्सवाच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविले. विजेत्या स्पर्धकांचा तसेच सहभागींचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिक, स्पर्धक, कुटुंबीय व आयोजक उपस्थित होते.
यावेळी आयोजक युवासेना तालुका प्रमुख महेश पाटील व ॲड. सुनंदा महेश पाटील यांनी सांगितले की, “यंदाच्या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. पुढील वर्षी यापेक्षाही मोठ्या उत्साहात, अधिकाधिक घरांचा सहभाग घेऊन आणि अधिक व्यापक स्वरूपात मकर सजावट स्पर्धेचे आयोजन करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आपल्या गावातील कला, संस्कृती, परंपरा आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.” गणेशोत्सवाच्या माध्यमातून कला, संस्कृती, परंपरा, सामाजिक सहभाग आणि पर्यावरणपूरक सजावटीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.