loader
Breaking News
Breaking News
Foto

घाणेखुंटचे सरपंच राजू ठसाळे यांना ‘महाराष्ट्ररत्न आदर्श सरपंच’ पुरस्कार

वरवेली (गणेश किर्वे) - खेड तालुक्यातील घाणेखुंट ग्रामपंचायतीचे सरपंच राजू ठसाळे यांच्या उल्लेखनीय व लोकाभिमुख कार्याची दखल घेत त्यांना यंदाचा ‘महाराष्ट्ररत्न आदर्श सरपंच’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुणे येथील नालंदा ऑर्गनायझेशनच्या वतीने महाराष्ट्रातील विविध तालुक्यांमध्ये आदर्शवत काम करणाऱ्या सरपंचांचा राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. त्यामध्ये खेड तालुक्यातील घाणेखुंट गावाचे सरपंच राजू ठसाळे यांचा विशेष गौरव करण्यात आला. ग्रामविकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविताना ठसाळे यांनी आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सक्षमीकरण तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या कार्याची यापूर्वी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घाणेखुंट गावातील शाळा, अंगणवाडी, बचत गट, दिव्यांग व्यक्ती तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. शैक्षणिक कामांसाठी मोफत दाखले उपलब्ध करून देणे, शाळा व अंगणवाडीला सहकार्य करणे, बचत गटांना प्रोत्साहन देणे, पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे, गावात पथदिवे व रस्ते तसेच सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे, यामुळे ग्रामस्थांना मोठा लाभ झाला आहे. याशिवाय शाळा व अंगणवाडी तसेच दिव्यांगांसाठी मानधन आणि विमा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

टाईम्स स्पेशल

शंभरहून अधिक नागरिकांना शासकीय पेन्शन योजनांचा लाभ मिळवून देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत विकासकामांना प्राधान्य देणाऱ्या ठसाळे यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे घाणेखुंट गावाचे नाव राज्याच्या नकाशावर पोहोचले असून, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरपंच राजू ठसाळे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg