loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त मालवणात भव्य रक्तदान सोहळ्याचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) - राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त मालवणात भव्य रक्तदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. एकता मित्रमंडळ मालवण, ग्लोबल रक्तदाते मालवण-सिंधुदुर्ग आणि सेवा संकल्प अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय, मालवण यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत देसाई बिल्डिंग, कासार व्हाळी, भरड, मालवण येथे रक्तदान शिबिर होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्यात रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श रक्तदान संस्था, आदर्श कुटुंब, आदर्श कपल आणि आदर्श रक्तदात्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. दरम्यान, कै. सौ. नेहा कोळंबकर (शंकरदास) यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या रुग्णोपयोगी वैद्यकीय साहित्य योजनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. गरजू रुग्णांना नाममात्र दरात अल्पावधीसाठी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या या सेवाभावी उपक्रमाचा वर्षपूर्ती सोहळाही यानिमित्ताने होणार आहे.

टाईम्स स्पेशल

या योजनेअंतर्गत व्हीलचेअर, हॉस्पिटल बेड, वॉकर, कमोड चेअर तसेच इतर आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. रक्तदान शिबिर आणि वैद्यकीय साहित्य योजनेच्या या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन ग्लोबल रक्तदाते मालवण-सिंधुदुर्ग, एकता मित्रमंडळ मालवण, ग्रामीण रुग्णालय मालवण, ग्लोबल रक्तविरांगना मालवण आणि ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg