loader
Breaking News
Breaking News
Foto

जागतिक पर्यटन दिनानिमित्त गडसंवर्धकांचा सन्मान

खेड, : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय गोगावले, सचिव प्रणव मापुस्कर, श्रीमती कानडे व वैभव सागवेकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. मधुपेय प्रॉडक्ट, खेड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गडसंवर्धन, इतिहास जतन आणि वारसा संवर्धन क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी अध्यक्ष ला. सुरेश चिकणे यांनी प्रस्तावना करत महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या निःस्वार्थ आणि प्रेरणादायी कार्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी महाराष्ट्र प्रतिष्ठानचे सचिव प्रणव मापुस्कर यांनी सत्काराबद्दल लायन्स क्लबचे आभार मानले तसेच गडसंवर्धन मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. अध्यक्ष ला. अविनाश दळवी यांनी आपल्या मनोगतात महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे जतन करण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातील गडसंवर्धन मोहिमांमध्ये लायन्स क्लब ऑफ खेड सिटी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही दिली.

टाईम्स स्पेशल

या प्रसंगी माजी अध्यक्ष ला. महेंद्र शिरगावकर, माजी झोन चेअरमन ला. मिलिंदभाई तलाठी, माजी अध्यक्ष ला. रोहन विचारे, ला. पप्पू शेठ, ला. डॉ. मरकड, ला. सागर करवा, ला. डॉ. वेद तलाठी तसेच इतर लायन्स सदस्य उपस्थित होते. गडसंवर्धनासारख्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करून लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने सामाजिक बांधिलकीची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित केली. उपस्थितांनी महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांना अधिकाधिक पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg