loader
Breaking News
Breaking News
Foto

वाघवे भैरीच्या कोंडातील वैष्णवी भोगल बी.ए.च्या अर्थशास्त्र विषयात प्रथम; लक्ष्मीबाई पाटील पारितोषिकाची ठरली मानकरी

दापोली (प्रतिनिधी) : वैष्णवी भोगल हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) बी.ए. परीक्षेत अर्थशास्त्र (Economics) विषयात सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिला मानाचे 'लक्ष्मीबाई पाटील पारितोषिक' देऊन गौरवण्यात आले आहे. तिची ही कामगिरी केवळ कौतुकास्पद नाही, तर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणत्याही संकटावर मात करून यश संपादन करता येते याचा हा एक आदर्श वस्तुपाठ आहे. दापोली तालुक्यातील वाघवे या गावाच्या भैरीचा कोंड या अतिदुर्गम भागात रहिवास करणाऱ्या वैष्णवी भोगल या विद्यार्थिनीने खडतर परिस्थितीशी दोन हात करत आपल्या मनातील शिक्षणाची नुसतीच ईच्छा पुर्ण केली नाही तर बी.ए. परिक्षेत अर्थशास्त्र विषयात सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्र शासनाने प्रायोजित केलेल्या लक्ष्मीबाई पाटील पारितोषिकाची ती मानकरी ठरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ईच्छा असेल तर मार्ग सापडतो या उक्तीप्रमाणे तीने आपले प्राथमिक १ ली ते ५ वी. पर्यतचे शिक्षण आपल्या वाघवे भैरीचा कोंड येथे पुर्ण केले. त्यानंतर ६ वी ते ७ वीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वाघवे म्हैसोंडे येथे जाण्यासाठीचा धड चालण्यायोग्य रस्ता नसलेल्या मलक्या पायवाटेने जावून बाल वयातील शिक्षण पूर्ण केले तर आठवी ते दहावी सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयात पायपीट करत तिने शिक्षण पूर्ण केले. अकरावी ते बारावीचे शिक्षण कोणतीही वाहनाची सोय नसताना दापोली शहरातील न.का. वराडकर माध्यमिक विद्यालयात ती शिकली त्यानंतर मात्र पुढचे शिक्षण कसे घ्यायचे याचा तिच्यासमोर प्रश्न आ वासून उभा ठाकला. मात्र शिकायचेच गरीबीचा आणि परिस्थितीचा बाऊ न करता शिक्षण घेणे शक्य नसलेल्या वैष्णवी ने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची वाट धरली.

टाईम्स स्पेशल

तिने बारावीनंतर कॉमर्स सोडून आर्ट्स साईटचा मार्ग पत्करला आणि तिने बी.ए.च्या अंतिम वर्षात अंतिम परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांमध्ये अर्थशास्त्र विषयात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यामुळे प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने प्रायोजित केलेल्या लक्ष्मीबाई पाटील पुरस्काराची ती मानकरी ठरली. या तिच्या यशाचे चंद्रहास भोगल तसेच वाघवे भैरीचा कोंड सह दापोली तालूका आणि सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष हजारे यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg