loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणी कडक कारवाईची मागणी, सर्वधर्मीय नागरिकांचा मूक मोर्चा

म्हसळा - म्हसळा तालुक्यात मागील दोन महिन्यांत मौजे कांदळवाडा आणि म्हसळा शहरात अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांची फसवणूक करून लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणांमध्ये म्हसळा पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांत एकूण आठ आरोपींना अटक केली असून संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वधर्मीय नागरिकांनी केली आहे. या घटनांचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी एकाच महिन्यात दोन वेळा मूक मोर्चा काढला. म्हसळा-पाभरे फाटा येथून तहसीलदार कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढून नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात समाजातील मान्यवर तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी म्हसळा तहसीलदार अ.कारकून धोंडगे आणि पोलीस उप अधीक्षक योगिता कुटे यांना निवेदन देण्यात आले. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मोर्चादरम्यान समाजातील विविध घटकांनी प्रशासनाने अशा घटनांची गांभीर्याने दखल घेऊन जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली. पालकांनी तसेच नागरिकांनीही मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी पोलिस उपअधीक्षक योगिता कुटे यांनी मनोगत व्यक्त करताना घडलेल्या घटना प्रशासन आणि समाजासाठी निंदनीय असल्याचे सांगितले. महिनाभरात अशा स्वरूपाची दुसरी घटना घडणे ही गंभीर बाब असून भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे. कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास ती तत्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच घडलेल्या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी समाज, पालक आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम करण्याची गरज असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर आणि प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

माोर्चात मोठ्या प्रमाणात माहिला बंधूुभगिनींनी सहभाग घेऊन आपला विरोध दर्शवला. मोर्चाचे आयोजन म्हसळा तालुक्यातील स्थानीक व मुंबई निवासी कुणबी समाजाने केले होते. मोर्चाचे प्रास्ताविक राजाराम तिलटकर यांनी केले तर घटनेच्या निषेधार्थ सभापती बबन मनवे, माजी सभापती महादेव पाटील, हिंदु समाज अध्यक्ष समीर बनकर, सचिव महेश पवार, मुस्लिम समाज सचिव मुब्बशिर जमादार, माजी अध्यक्ष नाझीम चोगले, बौद्ध समाजाचे शशिकांत पवार, कुणबी समाज अध्यक्ष महादेव पाटील, मुंबईचे पदाधिकारी टिंगरे, महेश शिर्के आदींनी आपले मनोगत व्यक्त करून या वेळी आम्ही मूक मोर्चा काढून घटनेचा निषेध करत आहोत, अशाच घटना सातत्याने घडल्या तर आम्ही सर्व समाज उग्र आंदोलन करू, याची प्रशासनाने दखल घ्यावी, असे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg