रत्नागिरी : महाराष्ट्रातील एसटी कर्मचार्यांचे सर्व प्रश्न चिमूटभर वेळात आणि अत्यंत सहजतेने सोडवण्याची ताकद महायुती सरकारमध्ये आहे. त्यासाठी एसटी कर्मचार्यांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता, फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आणि निष्ठा दाखवावी, असे रोखठोक आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. शिव परिवहन वाहतूक व कामगार सेनेच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. कोकणची भूमी ही संघर्षातूनच मोठी झाली असल्याचे सांगत उदय सामंत म्हणाले की, संघर्ष हा आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे. त्यामुळे कोणाचेही राजकीय आव्हान स्वीकारण्याची आणि त्याचा सामना करण्याची पूर्ण ताकद आमच्यात आहे.
विरोधकांकडून सातत्याने खोटे आरोप केले जात आहेत आणि अडचणी निर्माण करण्यासाठी विविध केसेस दाखल केल्या जात आहेत; परंतु एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळे अडथळे लीलया पार करून उखडून टाकू, असा ठाम विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. कार्यकर्ते आणि नेत्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी दुटप्पी भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. वेगवेगळ्या राजकीय पर्यायांचा शोध घेतल्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांची सतत द्विधा मनस्थिती होते, असे सांगत सामंत म्हणाले की, आता सर्वांनी एकाच विचारावर ठाम राहून काम करण्याचा संकल्प केला पाहिजे. एसटी कर्मचार्यांनी कोणत्याही संभ्रमात न राहता एकसंधपणे महायुती सरकार पाठीशी उभे राहावे, कर्मचार्यांच्या हिताचे रक्षण करणे आणि त्यांच्या सर्व समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे, असा शब्द त्यांनी दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आयोजन करणार्या संघटनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ तसेच कार्याध्यक्ष सुनील साळवी यांच्या मेहनतीचे त्यांनी विशेष कौतुक केले. ज्येष्ठ नेत्यांच्या आवाहनाला मान देऊन आपण, आमदार किरण सामंत आणि राजू साळवी या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिल्याचे त्यांनी नमूद केले. या महत्त्वपूर्ण बैठकीस शिव परिवहन वाहतूक व कामगार सेनेचे प्रमुख पदाधिकारी प्रकाश निंबाळकर, संतोष शिंदे, राजू महाडिक यांच्यासह मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी व संचालक उपस्थित होते. सरकारच्या या आश्वासनामुळे एसटी कर्मचार्यांच्या प्रश्नांना लवकरात लवकर न्याय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.