वरवेली(गणेश किर्वे)- वाढदिवसाचा उत्सव केवळ शुभेच्छा व सत्कारा पुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य प्रमोद सीताराम गांधी यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त एसएमएस हॉस्पिटल, चिपळूण यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तळवळी येथे हे शिबिर होणार आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे.
रक्तदाब, रक्तातील साखर, डोळे व दातांची तपासणी तसेच ईसीजी या सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गरजेनुसार औषधांचेही मोफत वाटप केले जाणार आहे. सुरेंद्र ऑप्टिकल, मुंबई यांच्या सहकार्याने नेत्र तपासणीची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीकडेही लक्ष देत आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.या शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (चगझगAध) अंतर्गत पात्र रुग्णांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. हृदयविकार, मूत्रपिंड, पित्ताशय, कॅन्सर, हर्निया आदी आजारांसाठी आवश्यक उपचार व शस्त्रक्रियेबाबत पुढील प्रक्रिया समजावून सांगण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी, नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि गरजू रुग्णांना पुढील उपचारांची दिशा, अशा विविध अंगांनी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे तळवळी व परिसरातील विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रृंगारतळी जिल्हा परीषद गट उपतालुका अध्यक्ष स्वप्नील जाधव, मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक यांच्या वतीने करण्यात आले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.