मालवण, (प्रतिनिधी) - जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून यंदा जाहीर करण्यात आलेल्या ‘Digital Agenda and Artificial Intelligence to Redesign Tourism’ या संकल्पनेनुसार कोकणातील पर्यटनाला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाने पुढाकार घेतला आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून https://vmtravelmart.in हे विनामूल्य वेब पोर्टल सुरू करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक हॉटेल, लॉजिंग, होमस्टे, ॲग्रो-टुरिझम आणि लॉजिंग-बोर्डिंग व्यावसायिकांना या पोर्टलवर एकत्र आणले जाणार आहे. देश-विदेशातील पर्यटकांना सिंधुदुर्ग व कोकणातील पर्यटनस्थळे, निवास व्यवस्था, खाद्यसंस्कृती आणि स्थानिक संस्कृतीची माहिती एकाच ठिकाणी मोफत उपलब्ध होणार आहे.
पर्यटन व्यावसायिकांना पोर्टलवर मोफत नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन नोंदणीमध्ये अडचण येणाऱ्या व्यावसायिकांसाठी ८२७५१ ०६३७५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्यवसायाचे नाव पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महासंघाचे प्रतिनिधी संपर्क साधून नोंदणी पूर्ण करून देणार आहेत. कोकणातील पर्यटनस्थळे देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, सोशल मीडिया आणि AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे नियोजनही महासंघाने केले आहे. मालवणी खाद्यसंस्कृती, दशावतार लोककला, आंबा-काजू बागा, पारंपरिक जीवनशैली आणि निसर्ग पर्यटनाची माहिती विविध भाषांमध्ये पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. ‘AI + स्थानिक ज्ञान’ या संकल्पनेतून स्थानिक युवकांना डिजिटल टुरिझम गाईड म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. AI हे मानवाची जागा घेण्यासाठी नसून पर्यटन क्षेत्रातील माहिती व सेवा अधिक वेगवान, अचूक आणि प्रभावी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असे महासंघाचे म्हणणे आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला AI जिल्हा बनविण्याच्या प्रशासकीय प्रयत्नांनाही या उपक्रमाची जोड मिळणार असून, पर्यटन संचालन कोकण विभागाच्या समन्वयाने महासंघ डिजिटल पर्यटनाच्या क्षेत्रात काम करणार आहे. पर्यटनवाढीसोबतच निसर्ग संवर्धन, स्वच्छता, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, प्रशिक्षण आणि पर्यटन शिस्त यावरही स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने भर दिला जाणार आहे. कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देत पर्यटक आणि स्थानिक पर्यटन व्यवसाय यांच्यातील दरी कमी करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.