loader
Breaking News
Breaking News
Foto

मिरकरवाडा आदर्श मच्छीमार संस्थेचे माजी चेअरमन हाजी सुलेमान मुल्ला यांचे निधन

रत्नागिरी (जमीर खलफे) : रत्नागिरीतील खडप मोहल्ला, मिरकरवाडा येथील रहिवासी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हाजी सुलेमान बाबामिया मुल्ला यांचे रविवारी पहाटे वयाच्या ७२ व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण मिरकरवाडा व रत्नागिरी परिसरात शोककळा पसरली आहे. हाजी सुलेमान मुल्ला यांनी मिरकरवाडा आदर्श मच्छीमार सहकारी संस्थेचे माजी चेअरमन म्हणून उत्तम जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी नेहमीच रत्नागिरीतील मच्छीमारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी पुढाकार घेतला. मिरकरवाडा बंदरातील गाळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि त्यासाठी ते अनेकदा मुंबई व दिल्ली दरबारी देखील गेले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मच्छीमारी व्यवसायासोबतच त्यांनी धार्मिक व सामाजिक कार्यातही आपले मोठे योगदान दिले. ते मिरकरवाडा जामा मस्जिद आराकीन कमिटीचे आणि हुसैन पीर दर्गा कमिटीचे सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत होते. आपल्या कार्यतत्पर, मनमिळाऊ आणि हेल्पिंग स्वभावामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg