loader
Breaking News
Breaking News
Foto

शृंगारतळीच्या राजाची दिमाखात विसर्जन मिरवणूक

शृंगारतळी (जाहिद मुजावर) - ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ च्या जयघोषात, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची भव्य आतषबाजी करत ‘शृंगारतळीच्या राजा’ची विसर्जन मिरवणूक अत्यंत थाटामाटात काढण्यात आली. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी शृंगारतळी बाजारपेठेत गणेशभक्तांची गर्दी उसळली होती. ​गणेशोत्सवाच्या सांगतेनिमित्त शृंगारतळी बाजारपेठेत दुपारपासूनच भाविकांचा उत्साह आणि निरोपाचा भावूक क्षण पाहायला मिळत होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शृंगारतळीच्या राजाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी स्थानिक नागरिकांसह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भक्तांच्या या अलोट गर्दीमुळे संपूर्ण बाजारपेठ जनसागराने फुलून गेली होती. मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी झालेली फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि भक्तांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी, वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गुहागर पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक आणि चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg