दापोली (वार्ताहर) : २७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून काल २७ सप्टेंबर रोजी हॉटेल वृंदावन येथे दापोली विकास मंचच्या वतीने दापोली तालुक्यात पर्यटन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पर्यटन व्यवसायिकांची बैठक व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात पर्यटन व्यवसायिकांना भेडसावणार्या विविध अडचणी, त्यावरील उपाययोजना, प्लास्टिक निर्मूलनाची सुरुवात स्वतःपासून कशी करावी, तसेच दापोलीत येणार्या पर्यटकांचे अधिक चांगल्या पद्धतीने आदरातिथ्य कसे करावे, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रमोद जठार, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, हॉटेल समालीचे यादव, प्रा. कुणाल मंडलिक, बँक ऑफ महाराष्ट्राचे ग्रामीण शाखेचे व्यवस्थापक, उत्तर रत्नागिरी भाजपा अध्यक्ष सतीश मोरे, वैभव खेडेकर, केदार साठे, अक्षय फाटक, नरेश पेडणेकर, सचिन तोडकर, दीपक विचारे, बाळासाहेब नकाते, माधव शेटे यांच्यासह पत्रकार व दापोली तालुक्यातील मोठ्या संख्येने हॉटेल व पर्यटन व्यवसायिक उपस्थित होते.
प्रा. कुणाल मंडलिक यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पर्यटनस्थळे आणि पर्यटन व्यवसाय आधुनिक करण्याची गरज व्यक्त केली. स्थानिक रानभाज्या, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि स्थानिक जीवनशैली पर्यटकांसमोर आकर्षक पद्धतीने मांडण्याचे आवाहन त्यांनी केले. पर्यटकांना स्थानिक पदार्थ स्वतः बनविण्याचा अनुभव देण्यासारख्या संकल्पनाही राबविता येतील, असे त्यांनी सांगितले. पर्यटन व्यवसायिकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी आपण सदैव उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हॉटेल समालीचे यादव यांनी थ्री-स्टार किंवा मोठ्या ब्रँडच्या हॉटेलपेक्षा स्थानिक संस्कृती आणि खाद्यपरंपरा जपणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मोठमोठे हॉटेल ब्रँडदेखील आता स्थानिक खाद्यपदार्थ पर्यटकांना देण्यावर भर देत आहेत. त्यामुळे दापोलीतील व्यावसायिकांनीही स्थानिक चव, पदार्थ आणि संस्कृतीचा पर्यटकांना अनुभव द्यावा, असे त्यांनी सांगितले.यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राच्या ग्रामीण शाखेच्या व्यवस्थापकांनी पर्यटन व्यवसायिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध कर्ज योजनांची माहिती दिली. पर्यटन व्यवसायासाठी आर्थिक सहकार्य करण्याची बँकेची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर यांनी दापोलीचा पर्यटन व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी छोट्या-छोट्या बाबींवर लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. पर्यटन व्यवसायिकांना आवश्यक कर्ज कमीत कमी व्याजदराने उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सांगितले. तसेच विजेच्या वाढत्या समस्येवर उपाय म्हणून पर्यटन व्यवसायिकांनी सौरऊर्जा प्रकल्प उभारावेत, यासाठी दापोली अर्बन बँक शंभर टक्के कर्जसुविधा देण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधिकृत एजन्सीकडून सोलार सिस्टीम बसवून घेणार्या व्यावसायिकांना त्यासाठी आर्थिक सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच दापोलीत प्रशिक्षित टूर गाईड निर्माण करण्यासाठीही बँकेचे सहकार्य राहील, असे त्यांनी नमूद केले. पर्यटन विकासासोबत पर्यावरण संवर्धन, प्लास्टिक निर्मूलन, स्थानिक खाद्यसंस्कृती, डिजिटल तंत्रज्ञान आणि स्थानिक रोजगारनिर्मिती यांचा समन्वय साधून दापोलीचे पर्यटन अधिक सक्षम करण्याचा निर्धार या चर्चासत्रातून व्यक्त करण्यात आला. विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाने आणि पर्यटन व्यवसायिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने तसेच तालुक्यातील वेगवेगळ्या संस्था एकत्र येऊन जागतिक पर्यटन दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.