loader
Breaking News
Breaking News
Foto

छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित सरदेसाई वाड्याचे तातडीने संवर्धन व जतन करण्याची समाजसेविका वैदेही सावंत यांची मागणी

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा-संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित सरदेसाई वाड्याचे तातडीने संवर्धन व जतन करण्याची मागणी समाजसेविका वैदेही सावंत यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कसबा-संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्याची पाहणी केली असता वास्तूची झालेली दुरवस्था, पडझड आणि दुर्लक्ष निदर्शनास आले. इतिहासातील उपलब्ध नोंदीनुसार, फेब्रुवारी १६८९ च्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज विशाळगडाहून रायगडकडे जात असताना कसबा-संगमेश्वर येथे मुक्कामी होते. याच परिसरात त्यांना मोगल सेनापती मुकर्रब खानाच्या सैन्याने पकडले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे या वास्तूला छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेले महत्त्वपूर्ण स्मृतिस्थळ म्हणून जतन करण्याची गरज असल्याचे निवेदन चक्रभेदी सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा वैदेही सावंत यांनी केले आहे. सरदेसाई वाड्याची तातडीने शासकीय पुरातत्त्वीय पाहणी करून वास्तुस्थितीचा पंचनामा करावा, वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन व जतन करावे, उपलब्ध अवशेष सुरक्षित करून पुढील पडझड थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पुरातत्त्व विभाग, इतिहास संशोधक आणि वास्तुविशारदांच्या समितीमार्फत संवर्धन आराखडा तयार करावा, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची अधिकृत माहिती देणारे माहितीफलक व स्मृतिस्थळ विकसित करावे, अशीही मागणी आहे.

टाईम्स स्पेशल

कसबा-संगमेश्वरचा हा ऐतिहासिक वारसा पर्यटन व इतिहास अभ्यासाच्या दृष्टीने विकसित करून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच निवेदनावर कोणत्या विभागामार्फत, किती कालावधीत आणि कोणत्या निधीतून कार्यवाही केली जाणार आहे, याची लेखी माहिती द्यावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. स्वराज्याच्या इतिहासाचे स्मरण केवळ जयंती आणि घोषणांमध्ये न राहता ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनातूनही झाले पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीशी निगडित या वास्तूची आणखी पडझड होण्याची वाट न पाहता तातडीने कार्यवाही करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg