loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्यातील रिंगणे गांगोवाडी येथे स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बंद घर फोडणारे सराईत चोरटे गजाआड

लांजा (संजय साळवी) : बंद कर फोडण्याचा प्रयत्न करणारे सराईत अट्टल चोरटे केवळ स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पकडले गेले आहेत. ही घटना तालुक्यातील रिंगणे येथे घडली. मोटारसायकल घेऊन पळ काढण्याचा प्रयत्नांत असलेल्या या चोरट्यांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील रिंगणे गांगोवाडी येथे संतोष आयरे यांचे घर असून ते नोकरीनिमित्त मुंबईला वास्तव्याला असतात. त्यामुळे ते घर कायमस्वरुपी बंद असते. शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास होंडा शाईन या दुचाकीवरून आलेल्या संशयित संजय उर्फ मोहन निकाजा भोसले (२१ वर्षे, राहणार आष्टी तालुका, जिल्हा बीड) आणि नितेश उर्फ संतोष मरदान भोसले (२५ वर्षे, राहणार आष्टी तालुका, जिल्हा बीड) या दोघांनी पोपट पाना, स्क्रू ड्रायव्हर तसेच कटर आदिंच्या सहाय्याने संतोष श्रीधर आयरे यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही बाब शेजारी राहणारा जयेश संदीप आयरे (२६ वर्षे, राहणार रिंगणे ता. लांजा) याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर या दोघा चोरट्यांनी नंबर प्लेट नसलेल्या होंडा शाईन या दुचाकीवरून झर्ये - कारवली मार्गे पळून जाण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती जयेश आयरे यांनी रिंगणे गावचे सरपंच संजय आयरे यांना तात्काळ दिली. सरपंच संजय आयरे यांनी याबाबतची माहिती कोंडगे येथील महेश विश्वासराव, कुरंग येथील गणेश सुर्वे यांना दिली. त्यानंतर या सर्वांनी आपल्या मोटारसायकलनी या अट्टल चोरट्यांचा पाठलाग केला. त्यानंतर काही वेळातच नव्याने तयार करण्यात आलेल्या झर्ये - कारवली या रस्त्यावर या अट्टल चोरट्यांना पकडण्यात आले.

टाईम्स स्पेशल

केवळ स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हे दोघे अट्टल सराईत चोरटे पकडले गेले. त्यानंतर या दोन्ही चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ७० हजार रुपये किंमतीची होंडा शाइन मोटरसायकल तसेच चोरीच्या घटनेत वापरण्यात आलेला मोठा पोपट पाना, स्कू ड्रायव्हर, लोखंडी सुरा, हँडग्लोज, कटर, मास्क आदी साहित्य जप्त केले आहे. या दोघा सराईत चोरट्यांवर भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हेड. कॉन्स्टे. आशिष शेलार हे करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg